जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी “मिशन अभया” अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवत पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने “मिशन अभया” हा अनोखा उपक्रम दिनांक २५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, शाळेचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण भिंत, सन्मान जनक सुविधेसाठी शौचालय, सॅनिटरी नॅपकिन सुविधा व याबद्दलचे मार्गदर्शन इत्यादी उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. हे उपक्रम सर्व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा व त्यांच्यासाठी भयमुक्त समाज घडवणारा ठरेल हा विश्वास श्री. गजानन पाटील यांनी व्यक्त केला.
			        
			
								

